‘आई कुठे काय करते' या मालिकेने रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. मालिकेची कथा आणि मालिकेतील विविध व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. या मालिकेतली नवनवी वळणं मालिकेबाबतची उत्सुकता आणखी वाढवतायत.
घर सोडून गेलेल्या अनिरुध्दचा अहंकार आणि माज काही केल्या उतरत नाहीय, तर तो दिवसेंदिवस वाढतोय. म्हणूनच त्याला धडा शिकवण्यासाठी अखेर संजनाच्या नव-याने शेखरने चांगलंच पाऊल उचललं आहे. देशमुख कुटुंबियांचं घर सोडल्यापासून अनिरुध्द संजनाच्या घरी येऊन राहतोय. ते घर शेखरच्या नावावर आहे आणि त्याच्याच घरात राहून अनिरुध्द त्यालाच उलट सुलट बोलतो. म्हणून शेखरने थेट पोलिसांनाच अनिरुध्दविरोधात तक्रार दाखल केलीय.
पोलिस संजनाच्या घरी येऊन धडकतात. सोबत शेखरही आहे. आता संजना थांबवू शकेल का अनिरुद्धची अटक...? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.