'आई कुठे काय करते' ही सर्वांची लाडकी मालिका आहे. या मालिकेतली नवनवी वळणं प्रेक्षकांना खुप भावतात. मालिकेतलं कथानक आता खुपच इंटरेस्टिंग वळणावर येऊन पोहचलंय. संजनासाठी अरुंधतीचा पती मुलांना व आई-वडीलांना सोडून घराबाहेर गेला. तो आता संजनासोबतच राहतो. त्याचा माज तसूभरही कमी झालेला नाहीय.
इथे अरुंधती त्याच्या मुलांचा व कुटुंबाचा मनापासून जसं जमेल तशा पध्दतीने सांभाळ करतेय. तिला स्वावलंबी व्हायचंय. मुलं जरी मोठी असली तरी त्यांची सर्व जबाबदारी तिला पार पाडायचीय. त्यासाठी हवे ते कष्ट करण्याची तिची तयारी आहे. कुटुंबाचा रहाटगाडा पेलण्यासाठी आप्पांची पेन्शन आणि अभिच्या नोकरीच्या पगाराला हातभार लागावा म्हणून अरुंधतीने नोकरी करण्याचं ठरवलंय.
इशाच्या कॉलेजमध्ये क्राफ्ट टिचर म्हणून रुजू होण्यासाठी ती पुन्हा त्यांच्या मुख्याध्यापिकांना जाऊन भेटते आणि त्यासुध्दा तिला पुन्हा संधी देण्याचं ठरवतायत.