By  
on  

अखेर डॉक्टर अजितने मंजुळाला आपल्या जाळ्यात ओढलंच, पाहा व्हिडियो

काहीशी रहस्यमय अंगाने जाणारी मालिका म्हणजे ‘देवमाणूस’. या मालिकेत आता रंजक वळण येऊ घातलं आहे. कपटी अजितने अखेर त्याचा डाव साधला आहे. या मालिकेत डॉक्टरच्या कृष्ण कारस्थानाला पुन्हा एकदा मंजुळा बळी पडताना दिसणार आहे. मंजुळाला गोड बोलून त्याने आपल्या जाळळ्यात अडकवलं आहे.

 

 

मंजुच्या अडचणीचा फायदा घेत त्याने तिची जमीन कोणालाही विकू दिलेली नाही. मंजुळाला जमीन विकण्यासाठी सतत अडथळे येत असल्याने ती हतबल झाली आहे. त्यात पैशाची अडचण असल्याने ती डॉक्टरकडे मदत मागते. डॉक्टर तिची जमीन घेण्याचं आश्वासन देतात. या मदतीच्या खोट्या मुखवट्याला मंजुळा चांगलीच भुलली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive