'स्वराज्यजननी जिजामाता' मालिकेच्या सेटवर राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त झाले वृक्षारोपण

By  
on  

 स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक हक्काचं स्थान मिळवलं आहे. महाराष्ट्राच्या अभिमानाची यशोगाथा, जिजाऊंचे संस्कार या मालिकेद्वारे प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. 

12 जानेवारी राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबांची जयंती. त्या निमित्ताने स्वराज्यजननी जिजामाता मालिकेच्या सेटवर वृक्षारोपण करण्यात आले. स्वराज्यजननी जिजामाता मालिकेच्या टीमने 150 रोपटी लावली. या कार्यक्रमाला डॉ. अमोल कोल्हे, नीना कुळकर्णी आणि सयाजी शिंदे हे उपस्थित होते. 

शिवजयंती निमित्ताने शिरूर येथे बायोडायव्हर्सिटी प्लांटची उभारणी करणार असल्याचे डॉ. कोल्हेनी या वेळी सांगितलं. शिवभक्तांबरोबर या वृक्षारोपणाची हिरवी मशाल, या वृक्षारोपणाचा विचार घेऊन या वेळी शिवनेरीवर देखील जाऊ असंही ते म्हणाले. 

 

 

जिजाऊ माँ साहेबांच्या जयंती निमित्त मी सगळ्यांना हे आव्हान करतो की झाडांना पण एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे मान द्या तरच लोक त्यांना जपतील. 
पाहा, स्वराज्यजननी जिजामाता सोम.-शनि. रात्री 8:30 वा. फक्त सोनी मराठी वाहिनीवर

Recommended

Loading...
Share