‘चला हवा येऊ द्या’मध्ये जेव्हा अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डेंना फोन लावतात....’

By  
on  

‘चला हवा येऊ द्या’ च्या टीमने सगळ्यांनाच खळखळून हसवलं आहे. या शोच्या मंचावर आजवर अनेक कलाकार येऊन गेले आहेत. पण यावेळी या शोमध्ये मात्र खास पाहुणे हजेरी लावताना दिसत आहेत. सध्या या मंचावर दिग्गज हजेरी लावताना दिसणार आहेत. यामध्ये अभिनेते अशोक सराफ, निवेदिता जोशी-सराफ, मोहन जोशी, रोहिणी हट्टंगडी, अशोक पत्की, अशोक हांडे, जयंत सावरकर हे कलाकार उपस्थित होते.

 

 

यावेळी या कलाकारांनी जिगरी सहकलाकारांची आवर्जुन आठवण काढली. अशोक सराफ यांनी यावेळी लक्ष्मीकांत बेर्डेंना फोन लावला. तू इतक्यात कसा निघून गेलास. असं नाही चालणार. इथे सगळे तुझी आठवण काढत आहेत.’ यावर प्रत्येकाच्या चेह-यावर लक्ष्यामामाच्या आठवणीचे भाव दिसून आले. ज्येष्ठ अभिनेता मोहन जोशी यांनीही दिवंगत अभिनेता अविनाश खर्शीकर यांना फोन करत असाल तिथे खुष असाल ही इच्छा व्यक्त केली.

Recommended

Loading...
Share