गावागावातील राजकारणाच्या पार्श्वभूमीवर बेतलेली कारभारी लयभारी ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरतेय. राजकारणाच्या आड हळूहळू फुलणारी राजवीर आणि पियूची हटके लव्हस्टोर म्हणजे फुल ऑन धम्माल.
सध्या व्हॅलेंटाईनचा म्हणजेच प्रेम सोहळ्याचा आठवडा सुरु आहे. सर्वत्र प्रेमाला बहर आला आहे. अशातच कारभारी लयभारी मालिकेतही राजवीर पियूच्या लव्हस्टोरीचा ट्रॅक सुरुय. नुकताच प्रपोज डे हा दिवस साजरा करण्यात आला. व्हॅलेंटाईनमधला हा एक महत्त्वाचा दिवस.
पियूनेसुध्दा ह्या प्रपोज डेनमित्ताने एक प्रश्न राजवीरला थेट विचारला आणि त्याची विकेटच उडाली. या प्रेमवीरांचा हा धम्माल व्हिडीओ तुम्हालुध्दा खुप आवडेल.
या व्हिडीओत पियू राजवीरला हटके स्टाईलने प्रपोज करते. त्याला म्हणते, तुझ्या गावात ब-याचदा आली आहे मी पण आता सासुरवाडी म्हणून यायची इच्छा आहे माझी... येऊ ना? पियूच्या या प्रश्नावर आपला राजवर भैय्या फुल फ्लॅट होतो ना राव...