By  
on  

'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर'च्या मंचावर येणार डॉ. अमोल कोल्हे

महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' हा कार्यक्रम आता निर्णायक वळणावर पोचला आहे. या कार्यक्रमात आता टॉप पाच स्पर्धक राहिले  आहेत. त्यांच्यात चुरशीची  स्पर्धा सुरू आहे. या आठवड्यापासून प्रेक्षकांनी  स्पर्धकांना मतं द्यायची आहेत, त्यामुळे चुरस वाढणार आहे. परीक्षकांचा निकाल आणि प्रेक्षकांची  मतं  यांचे गुण ५०-५० टक्के असतील. त्या गुणांप्रमाणे स्पर्धकांना निरोप मिळणार  आहे. 

या आठवड्यात शिवजयंतीनिमित्त डॉ. अमोल कोल्हे 'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' या कार्यक्रमासाठी  उपस्थित राहणार आहेत.  मावळ्यांना मानवंदना देणारं खास सादरीकरण शिवजयंतीनिमित्तानं  झालं. प्राची आणि श्वेता यांचं सादरीकरण पाहिल्यावर डॉ. कोल्हे त्यांना 'जिजाऊंच्या लेकी' म्हणाले!  'हे असं सादरीकरण आपण कधीच करू शकणार नाही. मी या सर्व स्पर्धकांना  मनाचा मुजरा करतो,' असंही ते या वेळी म्हणाले. 

पाहा, 'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' १५-१६ फेब्रुवारी, रात्री ९ वा. फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive