By  
on  

कोल्हासुराने दिलं अंबाबाईला महायुद्धाचं आवाहन, ज्योतिबा येणार धावणार मदतीला?

दख्खनचा राजा ज्योतिबा मालिकाकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मालिकेला मिळत आहे. या मालिकेतील कलाकार, इफेक्ट्स यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. अभिनेता विशाल निकम या मालिकेत ज्योतिबांच्या भूमिकेत दिसत आहे. 
या मालिकेतील आता महत्त्वाचा टप्पा आता प्रेक्षकांना पाहता येणार आहे. सृष्टीला आपल्या अत्याचाराने त्राही भगवान करुन सोडलेल्या कोल्हासुराने रणगर्जना केली आहे.

 

 

त्याने प्रत्यक्ष महालक्ष्मी अंबाबाईलाच युद्धाचं आवाहन दिलं आहे. अंबाबाईला पराभूत करण्यासाठी त्याने भलीमोठी सेनाही सोबत आणली आहे. अंबाबाई आणि कोल्हासुराचं हे युद्ध महाएपिसोडमध्ये पाहता येणार आहे. वाईटावर चांगल्याचा विजय असलेल्या या महाएपिसोडबाबत प्रेक्षक उत्सुक असतील यात शंका नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive