By  
on  

‘येऊ कशी तशी मी नांदायला’मधील त्या दृश्यावर प्रेक्षकांची नाराजी

छोट्या पडद्यावरच्या मालिकांभोवती अनेकांचं अवघं जगच गुंफलेलं असतं. त्यातलं कथानक त्यातल्या व्यक्तिरेखा नकळत त्यांना आपल्याशा वाटू लागतात. येऊ कशी तशी मी नांदायला ही जी मराठीवरची मालिका अल्पावधितच लोकप्रिय झाली. मालिकेचं फ्रेश कथानक सर्वांनाच भावलं आणि खास करुन ओम-स्विटूची प्यारवाली लव्हस्टोरी.पण आता सोशल मीडियावर या मालिकेतील एका दृश्यावर टीका केली जात आहे.

‘येऊ कशी तशी मी नंदायला’ या मालिकेत ओमकार खानविलकार हा प्रचंड श्रीमंत दाखवला आहे. त्याची मोठी बहिण मालविका हिला गर्भश्रीमंत असल्याचा प्रचंड गर्व आहे. ती मालिकेत गरीबांशी चुकीच्या पद्धतीने वागते तसेच तिला त्यांची चीड देखील येत असल्याचे पाहायला मिळते. नुकताच पार पडलेल्या एका भागामध्ये मालविका त्यांच्या घरातील सदस्य रॉकीला अत्यंत वाईट शिक्षा देते. ती रॉकीच्या गळ्यात कुत्र्याचा पट्टा घालते आणि त्याला कुत्र्याप्रमाणे गार्डनमध्ये वागण्याची शिक्षा देते. ते पाहून प्रेक्षकांनी या दृश्यावर आक्षेप घेतला आहे.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive