By  
on  

ठरलं तर ! या दिवशी आण्णा नाईक येणार प्रेक्षकांच्या भेटीला

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेचा तिसरा भाग येऊ घातला आहे. या मालिकेच्या निमित्ताने आण्णा नाईक पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. झी मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये अण्णा नाईक यांची बंदुक दिसत आहे. सोबतच पुन्हा गोळी सुटणार अण्णा नाईक पुन्हा येणार असे त्या पोस्टर वर लिहीले आहे. 

 

 

यासोबतच मालिकेची रिलीज डेटही समोर आली आहे.  या मालिकेचा तिसरा भाग हा २२ मार्चपासून रात्री ११ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा दुसरा भाग हा प्रीक्वेल होता. त्यामुळे तिस-या भागात काय असणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive