By  
on  

'कोण होणार करोडपती' ह्या कार्यक्रमाची नोंदणी सुरू

सोनी मराठी वाहिनीवर 'कोण होणार करोडपती' सुरू होणार आहे. ज्ञान तुम्हांला यशाच्या शिखरावर पोचवू शकतं.  मिस्ड कॉल म्हणजे एक करोडचा कॉल हा आता महाराष्ट्रासाठी मूलमंत्र झाला आहे. आता एक मिस्ड कॉल तुम्हांला करोडपती बनवू शकतो. एक मिस्ड कॉल देऊन तुम्ही कोण होणार करोडपतीमध्ये सहभागी होण्यासाठी रजिस्ट्रेशन करू शकता.

या वर्षी 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिन खेडेकर करणार आहेत. मराठी घराघरांत सगळ्यांना सचिन खेडेकर परिचित आहेत. आपल्या देहबोलीमुळे आणि आवाजामुळे सचिन खेडेकर हे प्रेक्षकांचे लाडके अभिनेते आहेत. या कार्यक्रमात सामान्यजन स्पर्धक  म्हणून हॉटसीटवर येतात. त्या प्रत्येकाला आपलंस करून त्यांच्याबरोबर हा ज्ञानाचा खेळ खेळावा लागतो. प्रेक्षकांना मोहित करून टाकणारा आवाज आणि समोरच्याशी संवाद साधण्याचं कसब हे खेडेकरांचे गुण आहेत. आणि त्यामुळेच स्पर्धकांना आणि प्रेक्षकांना ते आपलेसे वाटतील यात शंका नाही.

 

 

 

 

 

महाराष्ट्राने अनेक नामवंत जगाला दिले आहेत. महाराष्ट्र खऱ्या अर्थानं विद्येचं माहेरघर आहे. 'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात माहीत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या, मराठी मातीतल्या माणसांना हॉटसीटवर बसण्याची आणि करोडपती होण्याची संधी मिळणार आहे.

'कोण होणार करोडपती' ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी  २४ मार्चपासून नोंदणी सुरू होणार आहे. २४ मार्च ते २ एप्रिल यादरम्यान ८०८०० ४४ २२२ या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन किंवा सोनी लिव्ह ॲपवर जाऊन प्रेक्षक  नोंदणी करू  शकतात.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive