By  
on  

या मालिकेच्या जागी येणार ‘बायको अशी हव्वी’ ही नवीन मालिका

लॉकडाऊन संपल्यानंतर अनेक नव्या मालिकांची नांदी होते आहे. विविध विषयांवरील मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज असतात. कथानक शेवटाला आलेल्या मालिकेच्या जागी कोणती नवी मालिका येणार याची उत्सुकता असतेच. याशिवाय नव्या मालिकेचा प्रोमो आला की ती कधी प्रेक्षकांच्या भेटीला येते याचीही वाट पाहिली जाते. 

 

 

आताही 'बायको अशी हव्वी' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत जान्हवी ही गृहीणी आणि तिचा पति विभास यांची ही गोष्ट आहे. बायकांनी फक्त घरची कामं करावीत, करियर करु नये अशा विचारांचा हा विभास आहे. ही मालिका ‘चंद्र आहे साक्षीला’ ची जागा घेईल असं बोललं जात आहे. टीआरपी रेटिंगमध्ये या मालिकेची समाधानकारक कामगिरी नसल्याने निरोप घेणार असल्याचं बोललं जात आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive