By  
on  

‘देवमाणूस’ मालिकेचे 200 भाग पुर्ण, निर्माती श्वेता शिंदेने शेअर केली खास पोस्ट

मर्डर मिस्ट्रीवर आधारित असलेली रंजक मालिका म्हणजे ‘देवमाणूस’. एका बोगस डॉक्टरची ही कथा आहे. ही मालिका सत्यघटनांवर आधारित आहे. या मालिकेत गोड स्वभावाने भाबड्या लोकांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे जीव घेणा-या  एका बोगस डॉक्टरची मर्डर मिस्ट्री छोट्या पडद्यावर पाहता येते आहे. 

 

 

देवमाणूस या मालिकेने नुकताच 200 भागांचा टप्पा पार केला. यावेळी निर्माती श्वेता शिंदेने चाहत्यांचे आभार मानणारी पोस्ट शेअर केली आहे. ही मालिका निरोप घेणार की काय असा अनेका बातम्या दरम्यान या मालिकेने 200 भाग पुर्ण केले आहेत. या मालिकेत सरु आजी, टोण्या, डिंपल यांच्या भूमिकांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive