By  
on  

सईबाई सासूबाईंवर पडणार भारी, पाहा Video

सई आणि आदित्यच्या लग्नानंतर 'माझा होशील ना' ही मालिका आणखी रंजक वळणावर पोहचलीय. ब्रम्हे कुटुंबात सईचं सूनबाई म्हणून स्वागत झाल्यानंतर सईनेसुध्दा आपल्या लाघवी स्वभावाने आदित्यसोबतच सर्व मामांची मनं जिंकून घेतलीयत. नुकतीच ब्रम्हेंची संपूर्ण गॅंग आदित्य व सई या नवपरिणीत जोडप्यासोबत मनालीला हनीनमून ट्रीप करुन आले. तिथचे बंधू मामा आणि गुरप्रित व बिट्टो यांच्याबद्दल सई-आदित्यला समजलं. मग त्यांनी गुरप्रित व बिट्टोला वसंतस्मृतीत मानाने आणण्याचं वचनही दिलं.

सर्वजण धमाकेदार ट्रीप करुन घरी परतले न परतले तोच सिंधू नावाचं वादळ ब्रम्हे कुटुंबियांवर धडकलं. नेहमीप्रमाणेच आपल्या नाटकी स्वभावाने व षडयंत्र आखत सिंधूने घरात प्रवेश केला. मग ब्रम्हेंनी पुन्हा तिला बाहेर काढलं. पण जगदीश ब्रम्हेंची पत्नी म्हणून सिंधूला वसंत स्मूृतीमध्ये हक्काचा निवारा पाहिजेय त्यासाठी ती वाट्टेल ते करतेय. कोणालाच जुमानत नाहीय. सईने तिला पाय धुवूनच घरात घ्यावं अशी तिला गळ घातलीय. पण आपल्या सईबाईसुध्दा काही कमी नाहीत. त्यासुध्दा तिच्यावर भारी पडल्या आहेत. 

 

 

'माझा होशील ना'  या मालिकेच्या पुढील भागांची प्रेक्षकांना बरीच उत्सुकता आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive