By  
on  

अभि-अनघाच्या साखरपुड्यात अंकिताचे विघ्न, ‘आई कुठे…’मध्ये येणार नवा ट्विस्ट

'आई कुठे काय करते' या छोट्या पडद्यावरच्या लोकप्रिय कौटुंबिक मालिकेत सध्या अभिषेक-अनघाच्या साखरपुड्याची धामधूम पाहायला मिळतेय. साखरपुड्यासाठी गावी आलेल्या  देशमुखांच्या या हस-या खेळत्या कुटुंबांत संजनाच्या येण्याने मीठाचा खडा पडलाय. अभिचा गावाला साखरपुडा असल्याने गौरीला सोडायच्या निमित्ताने संजनाही इथे आलीय आणि ठाण मांडून बसलीय. ती सर्वांवर स्वत:ला लादतेय. य़श, अभि, आई, आप्पा, ईशा, गौरी कुणालाच ती इथे नकोय. 

आधीच देशमुखांच्या घरात संजनाची लुडबूड असतानाच, आता अंकिताच्या रुपाने नवीन वादळ येऊन धडकणार आहे. त्यामुळे ऐन साखरपुड्यात ‘आई कुठे काय करते’मध्ये कोणता नवा ट्विस्ट निर्माण होणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभि-अनघाच्या साखरपुड्याचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. यामध्ये एका फोटोत अंकिताच्या गळ्यात मंगळसूत्र दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये संजना अंकिताचं औक्षण करताना दिसते, तर एका फोटोत अरुंधती अभिषेकचा गळा धरताना दिसते. हे फोटो मालिकेचा भाग आहेत, की अशीच उत्सुकता वाढवण्याची एखादी ट्रीक हे ठाऊक नाही. मात्र मालिकेचा नवा प्रोमो नक्कीच उत्कंठा वाढवणारा आहे.

अभि-अनघाच्या साखरपुड्यावेळी अरुंधती संजनाला जाब विचारते की, अंकिताला अभिच्या साखरपुड्याविषयी तू सांगितलंस का. त्यावर “मी तिला हेच सांगितलं की अनिरुद्धने खूप प्रयत्न केला तुझा आणि अभिचं लग्न व्हावं म्हणून, पण अरुंधती…” असं संजना सांगत असतानाच अरुंधती तिच्या कानाखाली आवाज काढते. त्यानंतर चिडलेली अरुंधती “संजना, तू माझ्या संसारात ढवळाढवळ केलीस, पण माझ्या मुलांच्या वाट्याला जायचं नाही” असं भर समारंभात तिला सुनावते. सर्वच अवाक् होत पाहत राहतात. 

आता ही मालिका नेमकं कोणतं वळण घेते, हे येणा-या भागातच प्रेक्षकांना समजेल. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive