By  
on  

Video : कोण होणार शिर्के-पाटील घराण्याची सर्वोत्तम सून... ? पाहा 'सुख म्हणजे नक्की काय असतं !'

स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक असतं. गौरी आणि जयदीपची नकळत फुलत जाणारी प्रेमकहाणी सर्वांनाच भावते. पण त्याचसोबत इतर व्यक्तिरेखांनीही रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.

गौरी-जयदीपच्या प्रेमकहाणीत घरातलं सुनांचं राजकारण मोठा अविभाज्य घटक ठरतं. आता अशातच पुन्हा एकदा शालिनी आणि तिची जाव छोटी जाऊबाई गौरीच्या विरोधात उभ्या ठाकणार आहेत. माईंना त्यांच्या सासूबाईंनी दिलेली बोरमाळ आणि घरातली थोरली सून म्हणून दाखवलेला विश्वास आता त्यांना गौरीकडे सुपूर्द करायचाय. घराची संपूर्ण जबाबदारी एकटी गौरी व्यवस्थित सांभाळू शकते असा दादांनासुध्दा विश्वास आहे. म्हणूनच दोघांनी एकमताने गौरीला हा मान द्यायचा ठरवला. पण नेहमीप्रमाणे माशी शिंकलीच. शालिनीला मात्र यामुळे तिचा अपमान होतोय असं वाटतंय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

म्हणूनच शिर्केपाटील घराण्याची सर्वोत्तम सून कोण होणार हे ठरवण्यासाठी स्पर्धा घेण्याचं शालिनीने माईंना सुचवलंय. आता माईसुध्दा  स्पर्धा घेऊनच ही बोरमाळ त्या सर्वौत्तम सुनेकडे सुपूर्द करणार आहेत. आता शिर्केपाटलांच्या तीन सुनांपैकी कोणाला हा मान मिळणार, गौरी यात यशस्वी होणार का हे पाहणं उत्सुकतेचं राहणार आहे.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive