अग्गंबाई सूनबाई ही छोट्या पडद्यावरील प्रचंड लोकप्रिय मालिका. अग्गंबाई सासूबाई या मालिकेचा हा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पहिल्या भागात स्वत:च्या पायावर उभी असणारी स्वावलंबी शुभ्रा सासूबाई आसावरींना स्वाभिमानाने जगायला शिकवते. तर या दुस-या भागात आसावरी खुप मोठ्या कंपनीची मालकीण आहे. तिचा कामाचा व्यवसायाचा खुप मोठा डोलारा आहे. तर सून शुभ्रा मुलगा बबडूसाठी आणि घराला सांभाळण्यासाठी आपलं करिअर सोडून देते. संपूर्ण वेळ ती घरात राबत असते. पण एका प्रसंगाने शुभ्राला तिच्यातील स्वाभिमान पुन्हा एकदा पेटून उठलाय.
शुभ्राची हौस मौज म्हणजेच दागिने-साड्या आणि बबडूचे लाड पुरवण्यासाठी सोहमला त्याला डीबीके कंपनीत मिळणारा पगार पुरत नाहीय असं त्याचं म्हणणं आहे. या दोघांच्या गरजा भागविण्यासाठी सोहमला वाईट मार्गाने पैसे कमवावे लागतायत असं तो तावातावाने सुझॅनसमोरच शुभ्राला सुनवतो.
सोहमचं बोलणं मनाला प्रचंड लागल्याने रडत रडतच शुभ्रा घरी येते . सोहमला तिच्या सुखासाठी वाईट मार्गाने पैसे कमवावे लागतात याचं तिला खुप वाईटतं. ती मनाशी पक्क करते की आता स्वावलंबी व्हायचं. पुन्हा पुर्वीसारखं करिअर करायचं. आता याचे पडसाद पुढे कसे उमटणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.