By  
on  

शर्वरीचं प्रेम शंतनूच्या जीवावर तर बेतणार नाही ना? पाहा व्हिडियो

‘शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकेत आता प्रेमाचा अनोखा खेळ रंगताना दिसतो आहे.  माधुरी शर्वरीला शंतनूपासून लांब तिच्या घरी घेऊन आली आहे. पण शंतनूने मात्र शर्वरीची साथ न सोडण्याचा वसा घेतला आहे. माधुरीने मात्र शंतनूला त्रास देण्यासाठी नवनवीन युक्त्या शोधण्याचा वसाच घेतला आहे. ती शंतनूला अनेकदा परक्यासारखं वागवते.

 

 

त्याला अपमानित करण्याची एकही संधी सोडत नाही. पण माधुरीच्या सगळ्या परिक्षेत पास होण्यासाठी शंतनू अतोनात प्रयत्न करताना दिसतो आहे. पण त्याचे एक कष्ट त्याच्या जीवावर बेतताना दिसत आहे. आता शर्वरी यातून काही मार्ग काढेल की शंतनू केवळ माधुरीच्या हातातील खेळणं बनून राहील हे लवकरच कळेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive