By  
on  

‘देवमाणूस’ मालिकेत नवा ट्वीस्ट, डिंपल आणि डॉक्टरच्या लग्नात घडणार ही घटना

देवमाणून मालिकेतील ट्वीस्ट आणि टर्न प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. अजितचा पर्दाफाश होऊन दिव्या सिंगच्या हाती कधी लागणार याची प्रेक्षकांनाही उत्सुकता आहे. दिव्या सिंगला डॉ अजितकुमार विरोधात सापडलेले पुरावे या सर्व गोष्टींमुळे मालिका एका निर्णायक वळणावर येताना दिसत आहे. मालिकेत एकीकडे डिंपल आणि डॉक्टरच्या लग्नाची तयारी सुरु आहे.

 

तर एकीकडे दिव्या डॉक्टरांना पकडण्यासाठी जाळ विणते आहे. डॉक्टरच देवीसिंग आहे अशी खात्री आता दिव्याला पटली असल्याने आता ती पुढे कोणते पाऊल उचलणार याकडे मालिकेच्या प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.  त्यामुळे या लग्नातच दिव्या अजितला अटक करण्याची शक्यता आहे. लग्नातच देवीसिंगला अटक होईल आणि मालिका प्रेक्षकांचा निरोप घेईल हे स्पष्ट झाले आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive