By  
on  

ओमकार निघाला लंडनला, काय होणार ओमकार-स्वीटूच्या प्रेमकहाणीचं?

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत आता रंजक वळण येताना दिसतं आहे. मोहितशी होणा-या साखरपुड्यामध्ये ओमने तिच्यावरचं प्रेम व्यक्त केलं आहे. या प्रेमाला स्विकारण्यास स्वीटूची घालमेल मात्र सुरु आहे. आता स्वीटू ओमच्या प्रेमाला स्विकारते का याची उत्सुकता आहे. 

 

 

या दरम्यान ओमने लंडनला जाण्याचा निर्णय घेतला आहे. स्वीटूने त्याच्या प्रेमाला कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. ओमच्या घरचे सगळे त्याच्या या निर्णयाने कमालीचे दु:खी झाली आहे. या दरम्यान स्वीटूचा भाऊ तिला बोलताना दिसतो. पाच मिनिटाच्या अंतरावर असलेलं घर किंवा ओमकारची सोबत यातून निवड करण्यास सांगतो. आता स्वीटू काय निर्णय घेते याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive