By  
on  

स्वीटू आणि ओमच्या नात्याची होणार गोड सुरुवात, स्वीटू देणार प्रेमाला होकार

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेच्या प्रेक्षकांना सगळ्यात जास्त उत्सुकता आहे ती स्वीटू आणि ओमच्या नात्याची. ओमने लंडनला जाण्याचा निर्णय घेतला आहे. स्वीटूने त्याच्या प्रेमाला कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. ओमच्या घरचे सगळे त्याच्या या निर्णयाने कमालीचे दु:खी झाली आहे. या दरम्यान स्वीटूचा भाऊ तिला बोलताना दिसतो.

 

 

पाच मिनिटाच्या अंतरावर असलेलं घर किंवा ओमकारची सोबत यातून निवड करण्यास सांगतो. यावेळी स्वीटूच्या मनात असलेलं ओमचं प्रेम जिंकतं आणि ती त्याला थांबवण्यासाठी निघते. विशेष म्हणजे अगदी फिल्मी पद्धतीने स्वीटू तिचं प्रेम ओमजवळ व्यक्त करताना दिसणार आहे. 1 जूनला हा रोमॅंटिक एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive