By  
on  

अपर्णा-सुजितच्या लग्नामुळे संजूसमोर कोणतं नवं आव्हान ठाकणार?

‘राजा राणीची गं जोडी’ मालिकेत आता नवा ट्वीस्ट पाहायला मिळतो आहे. रणजीतपासून लपवलेले तिच्या वयाचे सत्य सगळ्यांसमोर आलं आणि या जोडीला जणू कुणाची तरी दृष्ट लागली. संजुच्या वयाचे सत्य रणजीत आणि ढाले पाटील कुटुंबासमोर आलं. संपूर्ण ढाले पाटलांची कुटुंबाची अब्रू या प्रकरणाने धुळीला मिळाली. ढाले पाटलांच्या घरात संजीवनीला कोणताही मान राहिला नाही. 

 

 

त्यामुळे सुजितला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अपर्णाने ढाले पाटलांच्य घरात प्रवेश करण्याचं नक्की केलं आहे. केवळ संजीवनीला विरोध करण्यासाठी आईसाहेबांसह घरातील सगळ्यांनीच या लग्नाला मान्यताही दिली आहे. आता अपर्णाचा कपटीपणा संजीवनी सगळ्यांसमोर आणेल का हे मात्र काळच ठरवेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive