By  
on  

या दिवशी नवनाथांचा महिमा अनुभवता येणार छोट्या पडद्यावर

महाराष्ट्राच्या संतपरंपरेत नाथ संप्रदायाचं योगदान अमुल्य आहे. महाराष्ट्रातही नाथ संप्रदायाचे अनुयायी अनेक आहेत. नवनाथांच्या उत्पत्तीची कथा आता मालिकेच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. सोनी मराठी वाहिनी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच  नवनाथांवर मालिका घेऊन आली आहे. 'गाथा नवनाथांची' ही मालिका 21 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

 

नवनाथांची उत्पत्ती कशी झाली, हे या जाहिरातीमधून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, कानिफनाथ आदी सर्व नवनाथांच्या उत्पत्तीची गोष्ट या जाहिरातीमधून प्रेक्षकांना दिसणार आहे. या मालिकेची वेळही लवकरच समोर येईल. ही मालिका सोनी मराठीवर प्रसारित होणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive