पाहा Video : हा प्रेमाचा खेळ जिंकणार का जयदीप-गौरी...?

By  
on  

सध्या स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनलीय, ही मालिका घराघरांत पोहचलीय. कोल्हापूरच्या शिर्के-पाटलांच्या परिवाराची ही कहाणी तुफान गाजतेय. म्हणूनच  ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’या मालिकेच्या नवनव्या भागांची प्रेक्षकांना कायम उत्सुकता असते. 

प्रेमाचा खेळ ज्याला जमला तोच जिंकला. शिर्के-पाटील यांच्या घरात जयदीप आणि गौरी एक खेळ खेळतायत आणि त्या प्रेमाच्या खेळात एकमेकांचा सहवास लाभल्याने दोघेही भान हरपून गेले आहेत. घरातले सर्वचण त्यांना या खेळासाठी टाळ्या वाजवून चिअर अप करतायत. गौरी जयदीपचं नातं आता ख-या अर्थाने नवरा-बायको होण्याच्या दिशेने पाऊल टाकतंय,

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

 

'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही जयदीप आणि गौरीची हळूवार फुलत जाणारी कहाणी रसिक प्रेक्षकांना खुप भावतेय, तर शालिनी वहिनींच्या दुष्ट कारवायांनी शिर्के-पाटील कुटुंबियांच्या नाके नऊ आणलेत. तर दादा-माईंची माया सर्वांनाच हवीहवीशी वाटेतय. त्यामुळे आता  उत्कंठावर्धक अशी  ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मालिका पाहण्यासाठी प्रेक्षक सतत आतुर आहेत यात शंका नाही.  

Recommended

Loading...
Share