सध्या स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनलीय, ही मालिका घराघरांत पोहचलीय. कोल्हापूरच्या शिर्के-पाटलांच्या परिवाराची ही कहाणी तुफान गाजतेय. म्हणूनच ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’या मालिकेच्या नवनव्या भागांची प्रेक्षकांना कायम उत्सुकता असते.
गौरी जयदीपचं नातं आता ख-या अर्थाने नवरा-बायको होण्याच्या दिशेने पाऊल टाकतंय. जयदीप गौरीच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभा असतो. प्रत्येक संकटात तिची साथ देतो आहे, त्याच्यावरचं प्रेम व्यक्त करण्याचं गौरीने ठरवलंय. त्यासाठी तिने जय्यत तयारीसुध्दा केलीय आणि ती जयदीपसमोर आपल्या प्रेमाची कबुली देतेय, पण जयदीप यापासून अनभिज्ञ आहे. गौरी मनातील भावना व्यक्त करेल तेव्हा जयदीपची काय प्रतिक्रीया असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.