कोण आहे ही बाई जिच्यामुळे अजितकुमारची हरपली शुद्ध, 'देवमाणूस'मध्ये नवा ट्विस्ट

By  
on  

देवी सिंग उर्फ डॉ. अजितकुमारच्या हुशारीला दाद द्यावीच लागेल. 10 खून करुन ती पचविण्याची हिंमत बाळगणारा कोर्टात आणि प्रत्येक साक्षी पुरावे फिरवून लावत स्वत:ची केस चतुराईने लढणारा हा माणूस नावालाच काळिमा आहे. इन्स्पेक्टर दिव्या सिंग आणि सरकारी वकील आर्या ह्यांनी देवी सिंगला फासावर लटकविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत केले, परंतु ते सर्वच निष्फळ ठरले. 

रेश्माच्या पतीने तिच्या खुनाचा बदला घेण्यासाठी कोर्टाच्या आवारातच देवी सिंगवर हल्ला केला. परंतु त्यातूनही तो बचावला आणि त्याने पलटवार करत रेश्माच्या पतीलाच बेड्या ठोकायला लावल्या.देवी सिंग प्रत्येक चाल विचारपूर्वक खेळला, म्हणूनच आता 10 खून करुनही पुराव्यांअभावी कोर्टाने त्याची निर्दोष मुक्तता केली. 

परंतु न्यायाधिशांनी ही घोषणा करताच एक बाई तिथे कोर्टात पोहचले आणि देवी सिंगची शुध्दच हरपते. ही बाई कोण आहे तिचा व देवी सिंगचा काय संबंध. तिच्या साक्षीने नेमकं काय घडणार यासाठी देवमाणूस मालिकेचे पुढील भाग पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

 

Recommended

Loading...
Share