‘देवमाणूस’ मधील सरु आजीच्या ‘त्या’ म्हणीवरुन उठला आहे वादंग

By  
on  

'देवमाणूस' या मालिकेतील सरु आजीचं कॅरेक्टर हे चांगलच लोकप्रिय आहे. आजीला जरी दिसत नसलं तर आजी वाड्याची काळजी घेते. तिचे संवाद तर चांगलेच लोकप्रिय आहेत.  देवमाणूस या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. 
उत्तम कथानक, गुणी कलाकार यामुळे मालिका प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. पण सध्या मालिकेला एका वेगळ्याच वादाला तोंड द्यावं लागतं आहे. १३ जुलै रोजी देवमाणूसचा प्रसिद्ध झालेल्या या भागात सरुआजी एक म्हण बोलल्या होत्या. ‘आपलीच मोरी आणि आंघोळीला चोरी’ या आशयाची ही म्हण होती.

 

याच म्हणीचा एक व्हिडियो व्हायरल झाला आहे. यात ‘आपलीच मोरी आणि…’ या म्हणी संदर्भात एक अश्लील शब्द कानावर पडताना दिसतो. याबाबत मालिकेवर आणि वाहिनीवर टीका होत आहे.याबाबत  झी मराठी वाहिनीचे प्रमुख निलेश मयेकर म्हणतात, हा खोडसाळपणा आहे. वाहिनीची बदनामी करण्यासाठी मुद्दाम हा व्हिडिओ व्हायरल केला गेला आहे. त्यात अश्लील शब्द वापरला गेल्याचा दाव केला जातो आहे. पण मालिकेच्या संवादात कोणत्याही अश्लील शब्द किंवा संवादाचा वापर केला नाही. संवादात कधीही चुकूनही कोणता अपशब्द येऊ नये; हे तपासण्यासाठी आमची एक वेगळी टीम काम करत असते.’

Recommended

Loading...
Share