पाहा Video : परीक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे आत्मविश्वासाने देऊ शकेल का गौरी...?

By  
on  

शालिनी वहिनी नेहमीच गौरीला कमी लेखत आल्या आहेत. गौरी म्हणजे घरातली एक नोकर असंच त्या तिला वागवतात. जयदीपची बायको म्हणून गौरी घरात आल्यामुळे शालिनीचा  पारा खुपच चढला आणि त्यामुळेच ती एकामागून एक खेळी खेलत गेली. आता शालिनी सौंदर्य स्पर्धेत सहभागी होतेय. म्हणूनच तिने कॅटवॉक करताना गौरीला तिच्या पायात शूज चढवायला सांगितले. गौरी ते काम निमूटपणे करायला घेते इतक्यात जयदीप तिथे  येतो आणि तो शालिनीला चॅलेंज करतो की ही सौंदर्यस्पर्धा गौरी जिंकून दाखवेल. 

 

या स्पर्धेसाठी जयदीपच गौरीला तयार करतो. सतत तिचा आत्मविश्वास वाढवतो. पण परीक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे आत्मविश्वासाने देऊ शकेल का गौरी...? या स्पर्धैत ती त्याचं मन जिंकू शकेल का आणि हा किताब ती मिळवेल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

या स्पर्धेसाठी खास परिक्षक म्हणून प्रसिध्द ज्येष्ठ अभिनेत्री किशोरी शहाणे-वीज आणि अभिनेत्री उर्मिला कोठारे या परिक्षण करणार आहेत.  

 

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’,च्या पुढील भागात आता नेमकं काय घडणार हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.
 

Recommended

Loading...
Share