पाहा Video : यश-गौरीचा साखरपुडा मोडण्यापासून वाचवू शकेल का अरुंधती?

By  
on  

स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. मालिकेत अनिरुद्ध देशमुखचा भाऊ म्हणजेच अविनाश देशमुखची एन्ट्री झाल्याने एकूणच उत्साह ओसंडून वाहतोय. अरुंधतीला देशमुखांचं घर सोडण्यापूर्वी यश-गौरीचा साखरपुडा करण्याची इच्छा असल्याने सर्वचजण हा कार्यक्रम छान साग्रसंगीत कसा होईल यावर भर देतायत.देशमुखांचं घर या साखरपुड्यासाठी आपल्या माणसांनी फुललंय.  सर्वचजण ब-याच दिवसांनी आणि महत्त्वाचं म्हणजे अंकितापासून अभिषेकची सुटका झाल्यानंतर पहिल्यांदाच आनंदात काहीतरी एकत्र येत साजरं करतायत.

पण असं असलं  तरीसुध्दा या साखरपुड्यात विघ्न येण्याची शंका आहेच. गौरीला तिच्या भूतकाळातील काही घटनेमुळे आता भविष्यात कधीच आई न होण्याच्या दुर्देवी सत्याला सामोरं जावं लागतंय. ही कटू गोष्ट यश ,अरुंधती आणि आप्पांना माहितीय. पण आज्जीला कोणीच याबद्दल अद्याप काहीच सांगितलेलं नाही. तिला जर हे कळलं तर ती हे लग्नच काय पण यश-गौरीचं नातं सुध्दा मान्य करणार नाही, याची भीती सर्वांना आहे. 

साखरपुड्यापूर्वी आज्जीला हे कळावं असं गौरीची इच्छा असते. अरुंधतीलासुध्दा गौरीचं म्हणणं मान्य आहे. नाहीतर ही आज्जीची फसवणूक होईल असं ती मानते. यश – आप्पा आज्जीला हे आता कळायला नको याच मतावर ठाम आहेत. पण साखरपुड्याच्या दिवशी गौरीच आपण कधीच आई होऊ शकणार नसल्याचं सत्य आज्जीला सर्वांसमोर सांगते. त्यामुळे आज्जीच्या पायाखालची जमिनच सरकते. देशमुखांचा वंश पुढे कसा चालणार याची तिला चिंता वाटते, त्यामुळेच हा साखरपुडा नक्की नीट पार पडणार ना हे येत्या भागात पाहण्याची रसिकांना उत्सुकता लागून राहिली आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

Recommended

Loading...
Share