‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेचे कलाकार कोकणवासियांच्या पाठीशी

By  
on  

आपल्या कोकणाला सध्या मदतीची गरज आहे. कोकणाने  नेहमीच आपल्याला भरभरुन दिलं आहे. आता वेळ आली आहे ती आपण कोकणवासियांच्या पाठीशी उभं राहण्याची.

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केलंय. या मालिकेला खुप लोकप्रियता  मिळतेय. या मालिकेतील सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. पण या मालिकेतील कलाकारांनी अभिनयासोबतच समाजाप्रती असलेल्या आपुलकीने सुद्धा प्रेक्षकांचं मन जिंकलंय. एकीकडे कोकणात पूराने थैमान घातलं. या पूरात अनेकांचे संसार उद्धस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेच्या कलाकारांनी पुढाकार घेतला आहे. 

या मालिकेतील अभिनेत्री गौरी किरण या मुळची कोकणातील आहे. त्यामुळे कोकणातील मुलगी छोट्या पडद्यावर झळकत असल्याने कोकणवासीयांचा या मालिकेसोबत खूपच आपुलकीचं नातं निर्माण झालंय. कोकणात मुसळधार पावसामुळे जी परीस्थिती उद्भवली आहे, अशा परिस्थितीत त्यांना आधार देण्यासाठी या मालिकेच्या कलाकार मंडळींनी येत नागरिकांना मदतीचे आवाहन केलंय.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Gauri Kiran (@megaurikiran)

 

 

 ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतील सर्व कलाकारांनी एकत्र येत सोशल मिडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये त्यांनी कोकणवासियांसाठी जास्तित जास्त दिवस टिकतील असे अन्न पदार्थ, कुटुंबातील जीवनावश्यक वस्तू, महिला व पुरुषांना लागणारी सर्व प्रकारची अंतर वस्त्रे, अंथरून-पांघरुण कोकणवासियांपर्यंत पोहोचवून त्यांना या संकटातून सावरण्यासाठी मदत करा, असं म्हटलंय. 

Recommended

Loading...
Share