वयानी खूप मोठ्या असणाऱ्या व्यक्तीबरोबर लग्न करुन ऐश्वर्या जाधव घराण्याची सून झाली आहे. ‘तू सौभाग्यवती हो’ मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे. सुर्यभानच्या रुक्ष स्वभावाशी ऐश्वर्या तिच्या निरागसपणाला अनुसरुन वागताना दिसते आहे. त्यामुळेच अनेकदा ऐश्वर्याकडून अनेकदा कळत नकळत चुका होताना दिसतात. पण या गोड चुका ऐश्वर्या आणि सुर्यभानला आणखी जवळ आणतात.
अनेक वळणं पार करत या मालिकेने 100 भागंचा टप्पा गाठला आहे. प्रेक्षकांच्या प्रेमामुळे 'तू सौभाग्यवती हो' या मालिकेनी गाठला आहे 100 भागांचा टप्पा! मालिकेवरचं तुमचं प्रेम असंच असू द्या. हे कॅप्शन असलेल्या पोस्टने मालिकेचे 100 भाग पुर्ण झाल्याचं दिसत आहे. या मालिकेत आता ऐश्वर्या सुर्यभानचं मन जिंकण्यात यशस्वी होते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.