माऊने आपलं संपूर्ण बालपण वडिलांच्या तिरस्कारामध्ये घालवलं. तिचं तोंड पहाणं हा देखिल अपशकून समजला जायचा. त्याच माऊचा लक्ष्मीच्या पावलांनी सन्मानाने गृहप्रवेश झाला आहे. माऊच्या वडिलांना आता खऱ्या अर्थाने पश्चाताप झाला आहे आणि म्हणूनच माऊला लेकीचा सन्मान देऊन त्यांनी जुनाट विचारांना झुगारुन लावलं आहे. या लाडक्या लेकीच्या तिरस्कारापायी कुणी तिचं बारसंही केलं नाही. आईने लाडाने माऊ हाक मारली आणि सर्वांचीच ती लाडकी माऊ झाली. मुलगी म्हणून मनापासून स्वीकारल्यानंतर वडिलांनी माऊचं मोठेपणी बारसं केलं आणि तिचं नाव साजिरी ठेवलं, तिच साजिरी आज इतकी मोठी झाली आहे, की लवकरच ती हे घर सोडून सासरी जाणार आहे.
विलास पाटलांची लाडकी लेक साजिरी वडिलांचा मनसन्मान जपून एसीपी सिध्दांतसोबत लग्नगाठ बांधणार आहे. आज ंमाऊच्या हळदीचा जोरदार समारंभ रंगणार आहे. त्यासाठी घरातले सर्वचण खुप आनंदी आणि उत्साही आहेत.
हातभर मेहंदी, पिवळ्या रंगाची छानशी जरीकाठाची साडी, फुलांची कर्णफुलं अशा सुंदर साजात हळदी समारंभासाठी नवराई माऊ खुपच गोड दिसतेय.
पण माऊ आणि एसीपी सिध्दांतचं लग्न होणार की काही विघ्न येणार, पुढे नेमकं काय घडणार तर दुसरीकडे माऊवर जिवापाड प्रेम करणारा शौनक ह्या लग्नाचा धक्का सहन करु शकेल, हे सर्व जाणून घेण्यासाठी पाहा 'मुलगी झाली हो' मालिका.