'देवमाणूस' मालिकेत आणखी एका व्यक्तिरेखेची भर, शेवटाकडे लागलंय प्रेक्षकांचं लक्ष

By  
on  

देवी सिंग उर्फ डॉ. अजितकुमारच्या हुशारीला दाद द्यावीच लागेल. 10 खून करुन ती पचविण्याची हिंमत बाळगणारा कोर्टात प्रत्येक साक्षी पुरावे फिरवून लावत स्वत:ची केस चतुराईने लढणारा हा माणूस नावालाच काळिमा आहे. इन्स्पेक्टर दिव्या सिंग आणि सरकारी वकील आर्या ह्यांनी देवी सिंगला फासावर लटकविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत केले, परंतु ते सर्वच निष्फळ ठरले.  देवी सिंग निर्दोष सुटला. 

देवीसिंग उर्फ डॉ. अजित कुमार देव पुन्हा एकदा गावात आणि त्याच्या दवाखान्यात परतला आहे. तसंच चंदाच्या येण्यानं तो बिथरला आहे.चंदा त्याला आपल्या तालावर चांगलंच नाचवतेय. तिच्यासोबत त्याने वागलेल्या प्रत्येक गोष्टीचा ती हिशोब घेणार आहे. देवमाणूस या लोकप्रिय मालिकेत पुढं काय होणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.

आता मालिकेत आणखी एका नवीन पात्राची भर झाली आहे. एक महिला अजित कुमारच्या दवाखान्यात तिच्या पतीसोबत आली आहे. पती श्रीमंत असल्याचं लक्षात आल्यानंतर तो हिला जाळ्यात ओढण्याचा प्लॅन बनवतो. गुजराती असलेली ही महिलासुध्दा अजित कुमारमध्ये इंटरेस्ट दाखवताना दिसतेय. डिंपलकडून अजितकुमार या महिलेची सर्व माहिती काढतो. आता मालिकेत पुढे काय ट्विस्ट येणार हे पाहण्याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. 

Recommended

Loading...
Share