विक्रांत सरंजामेची जादू चालली नाही, मालिकेच्या स्पर्धेत पाठकबाईंनी टाकलं मागे

By  
on  

मालिका आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्याचा भाग बनल्या आहेत. मालिकांमधील पात्रं त्यामुळेच आपल्याला जवळची वाटतात. या पात्रांवरही प्रेक्षक मनापासून प्रेम करतात. त्यामुळेच कि काय एखादी मालिका बराच काळ टीआरपी रेटिंगमध्ये असते.अलीकडेच जाहीर झालेल्या टीआरपी रेटिंगनुसार ‘माझ्या नव-याची बायको’ या मालिकेने आपलं सर्वोच्च स्थान कायम राखलं आहे. या मालिकेत आता शनायाची आई आल्याने नवा ट्वीस्ट आला आहे. त्यामुळे या मालिकेत नवं रोमांचक वळण मिळालं आहे.

दुस-या स्थानावर आहे पाठकबाई आणि राणादाची गोष्ट. या मालिकेत सध्या निवडणुकांचं वातावरण असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता ताणली जात आहे. त्यामुळेच या मालिकेला प्रेक्षकांनी दुस-या स्थानी ठेवलं आहे.

पण विक्रांत सरंजामे यांचा रोमॅंटिक अंदाज मात्र प्रेक्षकांना फारसा रुचलेला दिसत नाही. त्यामुळेच लोकप्रियता मिळऊनही ही मलिका ‘तुझ्यात जीव रंगला’ला पिछाडीवर टाकू शकत नाही. या यादीत चौथ्या स्थानी ‘स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका आहे.

आता नवीन वर्षात या यादीत काही बदल घडतो का हे पाहणं लक्षवेधी ठरेल.

Recommended

Loading...
Share