‘आई कुठे काय करते’ मालिका उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. अरुंधती आणि अनिरुद्धचा अखेर घटस्फट होतोय. अनेकदा अनिरुध्दने हा घटस्फोट न व्हावा यासाठी अरुकडे विनंती केली. पण ती तिच्या मतावर ठाम होती.अ रुंधतीच्या या निर्णयामुळे अनिरुद्धच्या अहंकाराला निश्चितच धक्का बसणार हे नक्की. खरतर अनिरुद्धकडून फसवणूक झाल्यानंतर खचून न जाता अरुंधती स्वयंपूर्ण झाली आणि कठीण प्रसंगात तिने स्वत:ला आणि संपूर्ण कुटुंबाला सावरलं. आता मात्र नको असलेल्या बंधनातून मुक्त व्हायचं अरुंधतीने ठरवलं आहे. त्यामुळेच अनिरुद्धला घटस्फोट देण्याचा मोठा निर्णय तिने घेतला आहे.
यशच्या साखरपुड्यानिमित्ताने अवघं देशमुख कुटुंब एकत्र आलं पण खरं कारण तर अरुंधतीला निरोप देण्याचं होतं. सर्वांचेच डोळे पाणावले, अरुंधतीसमोरसुध्दा संपूर्ण 25 वर्षांचा संसार आणि अनेक कटू-गोड आठवणी तरळल्या.
सगळ्यांनी जड अंत:करणाने अरुंधतीला निरोप दिला.
समृध्दी बंगला म्हणजेच अरुधंतीचं आपलं घर आणि तिचा देशमुख परिवार सोडताना तिची पावलं जड झाली.
अरुंधती अत्यंत ठामपणे आणि सत्सकविवेकबुद्धीला स्मरुन शांतपणे निर्णय घेते हे तिच्या व्यक्तिरेखेचं वेगळेपण आहे. या सगळ्यात घरातल्या जबाबदाऱ्या न नाकारता इतर कोणतीही नाती न विस्कटू देता ती तिच्या न्यायासाठी लढली.
आजवर अरुंधतीचं खंबीर रुप प्रेक्षकांनी पाहिलं आहे. त्यामुळे अरुंधतीचा पुढचा प्रवास कसा असणार हे पहाणं उत्सुकतेचं असेल. ती आता अरुंधती देशमुख नाही तर फक्त अरुंधती म्हणून प्रवास सुरु करतेय. त्यासाठी न चुकता पाहा ‘आई कुठे काय करते’ दररोज सायंकाळी ७.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.