By  
on  

देवमाणूसची टीम थिरकली ‘ओ शेठ’ या गाण्यावर, पाहा व्हिडियो

सध्या सोशल मिडियावर ‘ओ शेठ’ या गाण्याने धुमाकुळ घातला आहे. स्टेटस, रिल्स आणि इतर ठिकाणी ‘ओ शेठ’ हे गाणे ऐकायला मिळत आहे. आता देवमाणूसची टीमही या गाण्यावर थिरकताना दिसते आहे. डिंपलच्या भूमिकेत दिसणारी अस्मिता देशमुखने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

 

 

या व्हिडीओमध्ये अस्मिता देशमुख, नेहा खान, किरण गायकवाड, पुष्पा चौधरी हे कालाकार ‘ओ शेठ’ गाण्यावर धम्माल करताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून चर्चेत आहे. आता या मालिकेत वेगळंच वळण आलं आहे. चंदाच्या धाकाने काहीसा बिथरलेला देवीसिंग आता पुन्हा जाळं रचण्यासाठी सिद्ध झाला आहे. आता तो पुन्हा जाळ्यात अडकतो की त्यातून सहीसलामत सुटतो हे लवकरच समजेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive