सजला विक्रांत-ईशाचा लग्नमंडप, संगीत सोहळ्याचा व्हिडिओ व्हायरल

By  
on  

सध्या मालिकांच्या विश्वात एकच गडबड सुरु आहे ती म्हणजे ईशा आणि विक्रांतच्या लग्नाची. ईशा आणि विक्रांतच्या लग्नाची तारीख १३ जानेवारी आहे. हळद, मेहेंदी हे लग्नापूर्वीचे समारंभही सुरू झाले आहेत. झी मराठीने त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवरून ईशा आणि विक्रांतच्या संगीत सोहळ्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये व्हिडिओमध्ये ईशा आणि विक्रांतमधील केमेस्ट्री दिसून येत आहे. ‘हमने सोचा ना था’ या गाण्याच्या तालावर ईशा आणि विक्रांत एकमेकांच्या हातात हात घालून नृत्य करताना दिसत आहेत.

झी मराठीच्या ‘तुला पाहते रे’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘प्रेमाला वयाची मर्यादा नसते’ ही टॅगलाईन घेऊन या मालिकेने एका चाकोरी बाहेरच्या प्रेमकथेला हात घातला आहे. प्रेमाची अनेक अवघड वळणं पार करत ईशा आणि विक्रांतचं प्रेम आता लग्नाच्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलं आहे. ईशा आणि विक्रांतच्या वयातील अंतर पाहता या लग्नाला ईशाच्या वडिलांचा विरोध होता. पण विक्रांतने ईशाच्या वडिलांचं मन वळवलं आणि लग्नाला होकार मिळवला.

https://twitter.com/zeemarathi/status/1081473685309911042

आता ईशा-विक्रांतच्या नात्याला लग्नाच्या रुपाने नवी ओळख  मिळत आहे. प्रेक्षकांना इशा-विक्रांतचे लग्न 13 जानेवारीला सायंकाळी सात वाजता पाहायला मिळणार आहे. याआधी 11 तारखेला मेहेंदीचा कार्यक्रम होणार आहे तर 12 तारखेला त्यांचा साखरपुडा होणार आहे. या दोघांच्या जोडीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये विक्रांत रोमॅंटिक अंदाजात दिसत आहे. एकंदरीत ईशा-विक्रांतमुळे माहोल रोमॅंटिक झाला आहे हेच खरं!

 

 

Recommended

Share