छोट्या पडद्यावर सध्या मालिकांची भाऊ गर्दी झाली आहे. याला करोना काळ आणि लॉकडाऊनचा परिणाम असेल. गेले एक-दीड वर्ष हे मोठापडदा बंदच आहे. त्यामुळे करमणुकीचं साधन म्हणून छोट्या पडद्याकडे प्रेक्षक वळले आहेत. मालिकेंच्या या भाऊ-गर्दीत आपली मालिका तग धरवून रहावी यासाठी निर्माते-लेखक सध्या वाट्टेल तो ट्विस्ट मालिकांमध्ये घडवून आणतायत. यावरच प्रेक्षक वैतागले असून त्यांनी आपला संताप सोशल मिडीयातून व्यक्त केला आहे.
अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या 'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेतील एका दृश्यावर प्रेक्षकांना नाराजी व्यक्त केली आहे. नुकताच मालिकेत एक सीन दाखवण्यात आला होता. स्वीटूचा चुलत भाऊ चिन्या रेल्वेने प्रवास करत असतो. तर नेहमीच कटकारस्थानं करणारा मोहित त्याच डब्ब्यातून प्रवास करताना दाखवला आहे. चिन्या लोकलच्या दरवाज्यात उभा असतो. हे पाहून मोहित त्याच्या एका हातावर सेफ्टीपीन टोचवतो. त्यामुळं खांबाला धरून उभा असलेला चिन्याचा हात निसटतो आणि तो खाली पडतो. हे दृश्य पाहून प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला आहे. गरिबांची थट्टा , त्यांच्या विरोधात नेहमी कटकारस्थानं दाखवणं ही एक विकृती असल्याचं मत प्रेक्षकांनी व्यक्त केलं आहे.