‘राधा प्रेम रंगी रंगली’ मालिकेचे ४०० भाग पुर्ण, कलाकारांनी केलं असं सेलिब्रेशन

By  
on  

कलर्स मराठीवरील राधा प्रेम रंगी रंगली मालिकेने सध्या ४०० भाग पुर्ण केले आहेत. या मालिकेला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. राधिकाच्यी त्यागी आणि सोशीक व्यक्तिरेखा रसिकांच्या पसंतीस उतरली आहे. राधासाठी तिचं कुटुंब कायमच अग्रस्थानी राहिलं आहे. त्यामुळेच कुटुंबावर आलेलं प्रत्येक संकट राधा स्वत:च्या अंगावर घेते. लग्न झाल्यावर नव-याचं दुस-या बाईशी असलेलं अफेअरदेखील शांतपणे समजून घेणारी राधा या मालिकेमुळे घराघरात पोहोचली आहे.

या मालिकेने आता ४०० भागांचा टप्पा गाठला आहे. मालिकेतील कलाकारांनी सेटवर केक कापून आनंद साजरा केला आहे. राधाच्या आयुष्यातील अनेक वादळांनंतर तिला सुखाची चाहूल लागली आहे. राधा आणि प्रेमच्या आयुष्यात आता एक नवा पाहुणा येणार आहे. त्यामुळे आता राधाला दीपिकाच्या कारस्थानपासून जास्त सावध रहावं लागेल. त्यामुळे ही मालिका अधिकच उत्कंठा वाढवेल यात शंका नाही.

Recommended

Share