By  
on  

फार्मासिस्ट स्वाती शिंदे यांच्या करोना काळातील अनुभवाविषयी जाणून घेऊयात 'कोण होणार करोडपती'मध्ये

माणूस कोणत्याही मोठ्या संकटात सापडला, तरी त्याचं ज्ञानच त्याला त्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करू शकतं. ज्ञान तुम्हांला कधीही  उपयोगी पडू शकतं आणि हीच तुमची खरी ताकद आहे. 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमात याच ज्ञानाच्या साथीने स्पर्धक एक करोड रुपये जिंकू शकतात.

या आठवड्यात स्वाती शिंदे हॉट सीटवर खेळायला येणार आहेत. स्वाती या फार्मासिस्ट असून त्यांचं स्वतःचं औषधांचं दुकान आहे. फार्मासिस्ट स्वाती शिंदे यांनी कोवीड परिस्थितीत आपलं कार्य कशा प्रकारे सुरू ठेवलं होतं, हे पटवून दिलं. सचिन खेडेकर हे उत्तम संचालक असून हॉट सीटवर असलेल्या सर्व स्पर्धकांना सांभाळून घेतात आणि त्यांना बोलतंही करतात.

आपल्या ज्ञानाच्या जोरावर इथपर्यंत पोचलेल्या स्वाती किती रक्कम जिंकू शकतील, हे जाणण्यासाठी पाहा, 'कोण होणार करोडपती', सोम.-शनि. रात्री ९ वा. फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive