By  
on  

ही लाडकी मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, नवी मालिका होणार 30 ऑगस्टपासून सुरु

छोटया पडद्यावर सर्व टीआरपीचं गणित असतं. आता करोना लॉकडाऊन काळात तर छोट्या पडद्याकडे प्रेक्षकवर्ग मोठ्या संख्येने आहे. घराबाहेर पडून सिनेमे-नाटक पाहण्याची गेले एक-दीडड वर्ष कुठलीच सोय नाही. त्यामुळेच टीआरपीच्या रेसमध्ये जो तारला गेला तोच टिकला अन्यथा बाकीच्या मालिकांना आजकाल लवकरच आपला गाश गुंडाळावा लागतोय. 

झी मराठी वाहिनीवरील बऱ्याच मालिका हळुहळु प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसून येत आहे. अशात झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘माझा होशील ना’ आता वेगळ्याच वळणावर आली आहे.ही मालिकासुध्दा लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेतेय. कारण मालिकेचं कथानक बरचंसं लांबंल गेलं आहे व रटाळ होत चाललं आहे. झी मराठीवरील ‘माझा होशील ना’ ही मालिका फार कमी वेळात प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. गौतमी देशपांडे आणि विराजस कुलकर्णी या दोघांची फ्रेश जोडी देखील घराघरात सर्वांची आवडती जोडी ठरली. या मालिकेतील आदित्य आणि सई यांची हटके लव्ह स्टोरी आणि मामांची धम्माल प्रेक्षकांना खुप आवडलूी होती.आता या मालिकेच्या कथानकाचा शेवट कसा होणार हे पाहणंऔत्सुक्याचं ठरेल. 

माझा होशील ना या मालिकेच्या जागी येत्या ३० ऑगस्ट पासून ” तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं” ही मालिका प्रसारित होणार आहे. मालिकेचा प्रोमो नुकताच आला असून या मालिकेत प्रमुख नायिकेच्या भूमिकेत अभिनेत्री “अमृता पवार” झळकणार आहे. सोनी मराठी वरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेतून अमृता पवारने जिजामातोश्रींची भूमिका साकारली होती. ‘दुहेरी’ या मालिकेतून अमृताने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते. ललित २०५, जिगरबाज अशा आणखी काही मालिकांत तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकरलीय. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive