By  
on  

Video : श्रेयस -प्रार्थनाची रोमॅण्टिक केमिस्ट्री , पाहा 'माझी तुझी रेशीमगाठ'चा नवा प्रोमो

झी मराठी वाहिनीवर गेल्या काही दिवसांपासून एका नव्या मालिकेच्या प्रोमोने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. ते म्हणजे ब-याच काळानंतर अभिनेता श्रेयस तळपदे छोट्या पडद्यावर पुनरागमन करतोय. त्याच्याच “माझी तुझी रेशीमगाठ”  या नव्या मालिकेचा हा प्रोमो आहे. पण तो पाहताना लहान-थोर सारेच जण थबकून अय्या किती गोड.. असं म्हणायला अजिबात विसरत नाही. कारणसुध्दा तसंच आहे.
 

या प्रोमोमध्ये श्रेयसवर आपल्या प्रश्नांची सरबत्ती सुरु करणारी आणि त्याच्याबरोबर डेटवर आलेली गोंडस चिमुकली सध्या चर्चेचा विषय ठरतेय. आता याच मालिकेचा पुढचा प्रोमो समोर आला आहे. या मालिकेतला नायिकेचा उलगडा झालाय. अभिनेत्री प्रार्थना बेहरे या मालिकेची नायिका आहे. याचा उलगडा या नव्या प्रोमोतून झाला आहे. 

हिंदी टेलिव्हिजनमधून आपल्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केलेली मराठमोळी अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे. प्रार्थना चक्क 10 वर्षांनी झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या आगामी मालिकेतून मराठी टेलिव्हिजनवर पदार्पण करणार आहे. 

 

 

हा प्रोमो शेअर करत प्रार्थना लिहते,  10 वर्षांनी टिव्ही वर पुनरागमन करते आहे... तुमच्या घरातली, अगदी तुमच्यातली एक होण्यासाठी... तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहोत, हीच सदिच्छा...!!! तुमचीच प्रार्थना बेहेरे !!!...“माझी तुझी रेशीमगाठ " 

या मालिकेत प्रार्थनासोबत लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे मुख्य भूमिकेत आहे. मालिकेतून श्रेयसदेखील जवळपास १७ वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार आहे. मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षकही मालिकेची बरीच उत्सुकता आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive