स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. अल्पवाधित या मालिकेतील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांच्या हृदयात जागा मिळवली आहे. आई होण्याचं सुख दीपाच्या पदरी पडलं खरं, पण ते तिला उपभोगता येत नाही आहे. दीपाला जुळ्या मुली झाल्या आहेत.
पण श्वेताचा धोका असल्याने एका मुलीसोबत ती हॉस्पिटलमधून पळून जाते. यानंतर तिला आसरा देते अश्विनी. बाळासोबत असलेल्या दीपाची काळजी अश्विनी घेताना दिसते. अभिनेत्री वैशाली भोसले अश्विनीच्या व्यक्तिरेखेत दिसते आहे. वैशाली यापुर्वी चंद्र आहे साक्षीला मालिकेत दिसली होती.