अनेक रहस्य, रोमांचक वळणांनी देवमाणूस या मालिकेचा प्रवास अधिक रंजक केला. आजवर अनेक गुन्हे केले असूनही गावकरी अजूनही डॉक्टर अजितकुमारला देव मानतात. आता ही मालिका एका निर्णायक टप्प्यावर आली आहे. अजितचा बुरखा फाडण्याचे प्रयत्न एसीपी दिव्या सिंग आणि आर्या देशमुखने केले. पण त्यातही अजित कुमारने पळवाटा शोधून काढल्या.
पण आता मात्र अजितचा खरा चेहरा समोर येताना दिसणार आहे. नव्या प्रोमोमध्ये अजित आपल्या पापांची कबुली देताना दिसणार आहे. आता त्याच्या या कबुलीजबाबाचे कारण चंदा बनणार की आणखी कोण हे पाहणं मात्र उत्सुकतेचं ठरणार आहे. या वळणावर मालिकेत आता 2 तासांचा विशेष भाग पाहायला मिळणार आहे. येत्या 15 ऑगस्टला हा भाग प्रसारित होईल.