By  
on  

'देवमाणूस'मध्ये येणार नवा ट्विस्ट? चंदाचा होणार खून?

सर्वांची लाडकी रहस्यमय थरारक मालिका देवमाणूस आता निरोपाच्या उंबरठ्यावर आहे. या मालिकेत अनेक चढ-उतार आणि रंजक वळण पाहायला मिळतंय. 10 खून करुनही कोर्टात निर्दोष सिध्द झालेला देवी सिंग मोकाट सुटलाय. पुन्हा त्याने आपला दवाखाना उघडून लोकांची फसवणूक करण्याचं काम सुरु केलं आहे. पुराव्यांअभावी पोलिसांच्या हातून देवी सिंग निसटला खरा पण त्याच्या पुन्हा पुराव्यासकट मुसक्या आवळल्या जाणार आहेत. 

दरम्यान, देवी सिंगला पुरुन उरणारं चंदा नावाचं वादळ वाड्यात त्याच्या अवतीभोवती घोंघावतंय. देवी सिंगच्या अडचणी वाढल्या आहेत. चंदाकडे देविसिंगविरोधात काही पुरावे असल्यानं ती देवीसिंगला तिच्या ईशाऱ्यांवर नाचवताना दिसत आहे. चंदाला संपवण्यासाठी देवीसिंग आणि डिंपल प्रयत्न करतात. पण हे सोपं नाही हे त्यांनाही माहिती आहे. पण आता रागाच्या भरात डिंपलकडून चंदाचा खून झाला, असा प्रोमो झळकतोय. 

 

आता नेमकं पुढे काय घडमार , देवी सिंगला पोलिस कसे अटक करणार, मालिकेचा शेवट कसा होणार याची प्रचंड उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive