By  
on  

‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेने गाठला 300 भाग़ांचा टप्पा, हर्षद अतकरीची खास पोस्ट

स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत आता नवं वळण येणार आहे. शुभमने किर्तीला पेन गिफ्ट केलं आहे.  शुभमनेच हे पेन किर्तीसाठी जपून ठेवलं होतं. अपघात झाल्यानंतर हॉस्पिटलला नेताना किर्तीच्या वडिलांनी ही ठेव शुभमच्या हातात सोपवली होती. ती भेट या खास निमित्ताने त्याने आपल्या पत्नीला अर्थात किर्तीला दिली आहे. 

 

 

पण या सगळ्या धामधुमीतच ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेने 300 भागांचा टप्पा गाठला आहे. शुभम साकारणा-या हर्षद अतकरीने व्हिडियो पोस्ट करत ही बातमी शेअर केली आहे. हर्षद आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हणतो, ‘हे फक्त आणि फक्त रसिकप्रेक्षकांमुळे शक्य होतय... माझी चौथी मालिका, जिचे आज 300 भाग पूर्ण होत आहेत... असच प्रेम करत रहा, मी तुमचं मनोरंजन करण्याचा असाच प्रयत्न करत राहीन... ‘

Recommended

PeepingMoon Exclusive