आई कुठे काय करते या छोट्या पडद्यावरच्या लोकप्रिय मालिकेमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक ट्विस्ट आणि टर्न्स येत आहेत. अखेर अनिरुध्द आणि अरुंधतीचा घटस्फोटही झालाय. अरुंधती देशमुखांचं घर सोडून गेल्याने सर्वचजण या धकक्यातून अद्याप सावरलेले नाहीत. अरुंधतीच्या निर्णयाचा सर्वांनाच आदर वाटतो. तर अरुंधती इथे डोंबिवलीत माहेरी आईकडे राहायला आलीय. ती स्वत:ला घरकामात-आपल्या आवडत्या छंदात गुंतवतेय, चांगलं जगण्याचा प्रयत्न करतेय. तरीपण तिला सतत घराचे आपल्या कुटुंबियांचे , मुलांचे विचार घोंघावतायत पण तरीही ते विसरुन नव्याने आयुष्य जगण्याचा पुरेपूर प्रयत्न करतेय. मुलंही तिला डोंबिवलीला येऊन भेटून जातायत.
अशातच आई-आप्पांना भेटण्यासाठी म्हणून अरुंधती घटस्फोटानंतर पहिल्यांदाच देशमुखांच्या घरात पाऊल टाकतेय. तोच तिला समोर संजना घरात दिसते. अरुंधती खुशीत असल्याचं पाहून संजना तिच्या नेहमीच्या सवयीने तिला टोचून बोलते. तु तर छान आनंदात दिसतेय..मला वाटलं दुखी असशील . ..यावर अरुंधती जे काही संजनाला उत्तर देते त्याने सर्वचजण थक्क होतात.