By  
on  

‘ती परत आलीये’ मालिकेत दिसणार आहे ही अभिनेत्री

सध्या चर्चा आहे ती ‘तिची’. झी मराठी वाहिनीवर ‘ती परत आलीये’ या मालिकेच्या प्रोमोने प्रेक्षकांना चांगलंच घाबरवलं. या मालिकेच्या प्रोमोमध्ये आता एक भयानक चेहराही दिसतो आहे. आता पर्यंत मालिकेत विजय कदम दिसले आहेत. पण आता आणखी दोन कलाकारांची नावंही समोर आली आहेत. 

 

 

या मालिकेत कुंजिका काळवींत आणि श्रेयस राजेही दिसणार आहे. कुंजिका ‘स्वामिनी’ मालिकेत आनंदीबाईंच्या व्यक्तिरेखेत दिसली होती. त्यानंतर तिने चंद्र आहे साक्षीला मालिकेत मीराची व्यक्तिरेखा साकारली होती. तर श्रेयस फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत दिसला आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive