'येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत आता रंजक वळण आलं आहे. या मालिकेत अनेक वळणं आली. ओम आणि स्वीटूच मैत्रीपासून प्रेमापर्यंतचा प्रवास रंगतदार होता. या दोघांच्या प्रेमात अनेक अडचणी आल्या. पण या दोघांनीही हा प्रवास एकमेकांसोबत सुकर केला. ओम ची आई शकू दोघांच्या लग्नाला तयार असली तरी स्वीटू ची आई नलू हिचा मात्र विरोध होता.
पण हा विरोध आता मावळताना दिसतो आहे. आता नलूच या दोघांच्या लग्नासाठी पुढाकार घेताना दिसते आहे. त्यामुळे येत्या काळात या जोडीच्या लग्नाचा एपिसोड पाहायला मिळाला तर शंका नाही.