मराठी टेलिव्हिजनवर विशेष चर्चेत असलेली सोनी मराठीवरची ‘आई माझी काळुबाई’ ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच निर्धारित गोष्टीचा अंतिम टप्पा गाठत प्रेक्षकांचा निरोप घेते आहे.
स्वप्नात दिसणार्या गोष्टींचा मागोवा घेताना आर्या ‘मावळखेड’ या गावात पोहचते आणि त्या गोष्टी प्रत्यक्षात अस्तित्वात आहेत,हे लक्षात येईपर्यंत ती गावात,तिथल्या पाटील घराण्याच्या नजरकैदेत सून म्हणून अडकते. खलनायक विराट,त्याच्या कहयात असलेले पाटील कुटुंब आणि काळुबाईवरच्या श्रद्धा,भक्तीने त्यांच्यासमोर उभी ठाकलेली आर्या आणि वेळोवेळी तिला वाचवणारा पण पाटलांचा वंश असलेला अमोघ. यांची ही गोष्ट ज्या स्वप्नापासून सुरू झाली त्या स्वप्नातल्या दृष्टांताच्या पूर्तीचा प्रवास येत्या रविवारी पंधरा ऑगस्टला दुपारी १२ आणि संध्या. ७ वा. भव्यदिव्य स्वरुपात संपन्न होईल.
भक्ती आणि शक्तीच्या सामर्थ्याने पापाचा विनाश, विराटवर आर्याचा अखेरचा वार या शब्दात वर्णन होणारा हा प्रसंग आणि आई काळुबाईचे विराटरुप दर्शन या मालिकेवर प्रेम करणार्या प्रत्येकासाठी अभूतपूर्व अनुभव असेल. तेव्हा पाहायला विसरू नका, 'आई माझी काळुबाई'चा अंतिम महाएपिसोड भाग येत्या रविवारी १५ ऑगस्टला संध्या. ७ वा. फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.